"जनता वाऱ्यावर, नेते पदासाठी हॉटेलवर! चंद्रपूरच्या राजकारणातील वास्तव

February 07, 2026 by Prakash Hande

Congress leaders corporators : चंद्रपूर - नाट्यमय घडामोडीनंतर चंद्रपूर कांग्रेस पक्षाचे नगरसेवक अखेर एकत्र आले. महानगरपालिका निवडणुकीनंतर धानोरकर-वडेट्टीवार गटात संघर्ष वाढला होता. महापौर आमचा होणार असे दोन्ही नेते स्पष्ट बोलले, महापौर हा आपल्या गटाचा व्हावा यासाठी दोन्ही नेत्यांनी नगरसेवकांची पळवापळवी सुरू केली.
दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष वाढला, प्रदेश अध्यक्ष सपकाळ यांना मध्यस्ती करावी लागली, त्यानंतरही वाद काही थांबला नाही. (महापौर पदावरून भाजपात वाद), मुनगंटीवार यांचा पारा चढला)


दररोज शिवसेना खासदार संजय राऊत प्रमाणे विजय वडेट्टीवार मनपा महापौर बाबत पत्रकार परिषद घेऊ लागले. धानोरकरांनी गट स्थापन केला, गटनेता म्हणून सुरेंद्र अडबाले यांचं नाव पुढं आलं, वडेट्टीवार गटाला गटनेता मान्य नव्हता, आमच्याकडे नगरसेवकांचे संख्याबळ जास्त आहे, गटनेता आमचा व्हायला हवा असा हट्ट नेत्यांनी केला. धानोरकर गटाचे संख्याबळ कमी करण्यासाठी त्यांचे नगरसेवक पळविण्याचे काम केल्या गेले.


वडेट्टीवार समर्थक नगरसेवकांनी आपला वेगळा गट स्थापन करण्याचा प्रयत्न केला मात्र नियमाच्या चौकटीत न बसल्याने त्यांना नवा गट स्थापन करता आला नाही.
गल्लीतला वाद दिल्लीत पोहोचला, हायकमांड ने दोन्ही नेत्यांची समजूत काढली, दोघांनी एकत्र येत सत्ता स्थापन करीत महापौर बसवावा यासाठी प्रयत्न करण्याचे सांगितले.
मात्र वडेट्टीवार गटाने गट स्थापन न झाल्याने विभागीय आयुक्त विरोधात उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली. दुसऱ्या दिवशी वडेट्टीवार माध्यमांसमोर येत आता आमच्यात कसलाही वाद नाही, महापौर धानोरकर तर उपमहापौर व गटनेता आमचा असं ठरल्याचे जाहीर केले.


पदासाठी हपापलेले नेते आपसात लढत होते, आपले नगरसेवक राजकीय पक्षाच्या दावणीला लागू नये यासाठी त्यांना पंचतारांकित स्थळी नेण्यात आले.
या 15 दिवसांच्या कालावधीत नगरसेवकांची नेत्यांनी चांगली सेवा केली, प्रभाग वाऱ्यावर ठेवत नगरसेवक आपल्याच पक्षाच्या नेत्यांना घाबरताना दिसले, कांग्रेस पक्ष गटबाजीने शापित आहे, आजपर्यंत कांग्रेस पक्ष हा चंद्रपुरात दोन गटात विभागल्या गेला आहे.

कांग्रेस पक्षातील नेते आपल्या वर्चस्वासाठी लढताना दिसले, पक्षाचा विचार नगरसेवकांनी केला नाही फक्त आपला नेता महत्वाचा हेचं बघितले, आता नगरसेवकचं जेव्हा आपल्या पक्षाचे झाले नाही तर ते प्रभागातील जनतेचे होणार काय? हा प्रश्न कांग्रेसच्या वादातून निर्माण झाला आहे. आज सत्तेच्या वाटाघाटीत यश मिळाल्याने हे एकत्र आले अन्यथा चित्र काही और असते. शहराचा विकास करण्यासाठी सुद्धा नेते पदासाठी लढताना कांग्रेस पक्षात बघितले. कांग्रेस पक्षात फक्त महापौर पदाचा अनुभव केवळ संगीता अमृतकर यांना आहे. Congress leaders corporators

संगीता अमृतकर यांना वगळता दुसरा कुणी महापौर झाला तर त्याला अनुभव नसेल, तर त्यावेळी महानगरपालिका आज लढणारे नेते चालविणार. चंद्रपुरातील नागरिकांनी निवडणुकीपूर्वी भाजपातील भांडणे व निवडणुकीनंतर कांग्रेस पक्षातील भांडणे उघड डोळ्यांनी बघितले. सत्ता स्थापन झाल्यावर काय चित्र असेल हे १० फेब्रुवारी नंतर दिसणारचं.

Leave a Comment

+