चंद्रपूर मनपात हायव्होल्टेज ड्रामा! स्थायी समिती निवडीवरून काँग्रेसमध्ये उभी फूट; नगरसेवकांचा तडकाफडकी सभात्याग

March 05, 2026 by Prakash Hande

Standing Committee Members : चंद्रपूर - चंद्रपूर महानगरपालिका महापौर निवडीच्या जवळपास महिनाभरानंतर स्थायी समिती सदस्य निवडीसाठी ५ मार्चला मुहूर्त मिळाला, यासाठी मनपा सभागृहात घेण्यात आलेल्या विशेष सभेत चांगलाच गोंधळ उडाला, कांग्रेस गटनेत्याने आपल्या मर्जीतील नगरसेवकांचे नावे पुढे केल्याने कांग्रेस नगरसेवकांनी सभात्याग केला. स्थायी समिती सदस्यासाठी एकूण १६ नगरसेवकांची निवड करण्यात आली. (बंडू धोत्रे यांचे अन्नत्याग सत्याग्रह सुरु)

 

सदस्य निवडीकरिता कांग्रेस व भाजपच्या गटनेत्याने नगरसेवकांची नावे दिल्याने दोन्ही पक्षात गटबाजीचा संघर्ष पुन्हा उफाळला, कांग्रेस गटनेते राजेश अडूर यांनी स्वतःसह वसंत राजेश्वरराव देशमुख,चंदा मनोज वैरागड़े,संजीवनी राजु वासेकर, सचिन विनोद कत्याल,खान साफिया तवंगर खान, विनोद हरिश्चंद्र लभाने यांची नावे दिल्याने धानोरकर गटातील नगरसेवक नाराज झाले, त्यांना या समितीमध्ये स्थान न मिळाल्याने नगरसेवकांनी सभात्याग केला. यावेळी नगरसेवक सुरेंद्र अडबाले यांनी प्रतिक्रिया दिली कि आमच्या नेत्यांनी स्थायी समितीकरिता नावे दिली होती मात्र गटनेता अडूर यांनी आपली मनमर्जी चालवीत आपल्याच समर्थकांना सदस्यपद दिले. या घडामोडीमुळे धानोरकर-वडेट्टीवार गटबाजीला पुन्हा खतपाणी मिळाले.

 

भाजप कडून सुभाष दिनकर कासनगोट्टूवार, संजय नारायण कचर्लावार, पुष्पा संजय उराडे,सारिका सचिन संदुरकर,प्रज्वलंत प्रमोद कडू, सविता प्रलय सरकार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले, तसेच शिवसेना वंचित गटाकडून मनस्वी गिर्हे व श्रुती घटे, महानगर आघाडी गट तर्फे - प्रदीप शंकर देशमुख यांच्या गळ्यात सदस्यपदाची माळ टाकण्यात आली. भाजप नगरसेवकांच्या सदस्य पदावरून मुनगंटीवार समर्थक नगरसेवक रवि लोणकर यांना स्थान न मिळाल्याने ते चांगलेच नाराज झाले. भाजपच्या यादीत जोरगेवार गटाचे ४ तर मुनगंटीवार गटाचे २ सदस्यांची निवड करण्यात आली. Chandrapur Municipal Corporation

 

स्थायी समिती सदस्य निवडीत जवळपास महिनाभराचा विलंब झाल्याने नगरसेवक पप्पू देशमुख यांनी महापौरांना जाब विचारला, आपण एका नगरसेवकाच्या सांगण्यावरून हि निवडप्रक्रिया एक महिना लांबविली त्याकरिता आपण चंद्रपुरातील जनतेची माफी मागायला हवी. आपल्यामुळे चंद्रपूर शहराचा विकासाला विलंब झाला. 

Leave a Comment

+