Lohardongri Protest : चंद्रपूर : लोहारडोंगरी खाण प्रकल्पाच्या विरोधात आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते बंडू धोतरे यांच्या सुरू असलेल्या बेमुदत अन्नत्याग सत्याग्रहाच्या समर्थनार्थ आज चंद्रपूरकरांनी रस्त्यावर उतरून आपला रोष शांतपणे व्यक्त केला. आंदोलनाच्या नवव्या दिवशी 'सेव्ह लोहरडोंगरी, सेव्ह चंद्रपूर' या मोहिमेअंतर्गत शेकडो समर्थकांनी भव्य मानवी साखळी निर्माण करून सरकारचे लक्ष वेधले. (टुरिझम संचालिकेने पॅकेजच्या नावावर केली फसवणूक)
लोहारडोंगरी येथील प्रस्तावित खाण प्रकल्पामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास आणि वन्यजीवांच्या अधिवासावर येणारे संकट रोखण्यासाठी बंडू धोतरे गेल्या ९ दिवसांपासून अन्नाचा त्याग करून लढा देत आहेत. आज आयोजित मानवी साखळीमध्ये शहरातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, पर्यावरण प्रेमी आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. "लोहारडोंगरी वाचवा, चंद्रपूर वाचवा" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
काल रात्री धोतरेना रुग्णालयात भरती करण्यात आले होते, आवश्यक उपचार घेऊन आज सकाळी उपोषण मंडपात परतले. मात्र "जोपर्यंत शासन खाण प्रकल्पाच्या वन्यजीव विषयक परवानगी नाकारण्याबाबत ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही," असा निर्धार धोतरे यांनी व्यक्त केला आहे.
आजच्या आयोजनासाठी सेव्ह लोहरडोंगरी, सेव्ह चंद्रपूर सहकार्य करणारे संस्था संघटना व्यक्ती यांनी मोलाचे सहकार्य केले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत शासन कडून देण्यात आलेले पत्रानुसार उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आलेली आहे, यात नमूद
“राज्य वन्यजीव मंडळाच्या दिनांक ०६.०१.२०२६ रोजीच्या बैठकीत उक्त खाण प्रकल्पास राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे विविध अटी व शर्तीच्या आधारे शिफारशीत करण्यात आले आहे. तथापि, सदर प्रकल्पाच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यास याव्दारे तुर्तास स्थगिती देण्यात येत आहे.” Human Chain
यानुसार ‘तूर्तास स्थगिती’ हे आश्वासन असू शकत नाही. यावेळी आम्ही आमची प्रमुख मागणी नुसार ‘लोहारडोंगरी लोह खाण प्रकल्पाची राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाने केलेली शिफारस/परवानगी नाकारण्यात यावी’ या मागणी नुसार पत्रात उल्लेख असावा अशी मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार आश्वासन मिळण्याची आंदोलकांना अपेक्षा आहे.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मा. जिल्हाधिकारी, मा. मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर वनवृत्त यांचेशिवाय आंदोलकांच्या या शिष्टमंडळत स्वतः बंडू धोतरे, प्रा योगेश दुधपचारे, अभय बडकेलवार, किशोर जामदार, अब्दुल जावेद उपस्थित होते.
Leave a Comment