वरोरा: वरोरा सळाखीने मारहाण प्रकरणात जुन्या आर्थिक व्यवहारावरून एका तरुणावर हल्ला झाल्याची तक्रार दाखल झाली आहे. रॉयल प्लाझा हॉटेलसमोरील रस्त्यावर रविवारी रात्री ही घटना घडली. भूषण ज्ञानेश्वर झिले (३२) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांच्या तक्रारीनुसार विशाल गुरनुले याने लोखंडी सळाखीने हल्ला केला. (मुले शिस्तीत नाही, ८२ मुलांना केले अर्धटक्कल, वाचा हि बातमी)
वरोरा पोलिसांनी तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१) आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सुरू आहे.
वरोरा सळाखीने मारहाण: रॉयल प्लाझासमोर नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, वरोरा येथील होलटास सागर कॉलनी परिसर निवासी भूषण ज्ञानेश्वर झिले (वय ३२, व्यवसाय- सोलर मेंटेनन्स) हे रविवारी, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे ९:४० वाजताच्या सुमारास आनंदवन चौक येथून आपल्या घराच्या दिशेने पायदळ जात होते. ते रॉयल प्लाझा हॉटेलसमोरील रस्त्यावर पोहोचले असता, त्यांचा मित्र विशाल गुरनुले, तुषार गुरनुले व अन्य एक अनोळखी इसम अशा तिघांनी त्यांना गाठले. यावेळी विशाल गुरनुले याने भूषण यांच्यासोबत जुन्या आर्थिक व्यवहाराचा विषय काढून वाद घालण्यास सुरुवात केली.
वादाचे रूपांतर भांडणात झाल्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत विशाल गुरनुले याने लोखंडी सळाखीने भूषण यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात भूषण यांच्या उजव्या पायाच्या मांडीवर, पोटरीवर तसेच डाव्या पायाच्या घोट्याजवळ जबर मार लागून दुखापत झाली. घटनेनंतर जखमी भूषण झिले यांनी वरोरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपबिती सांगत तोंडी तक्रार नोंदवली.
तक्रारीच्या आधारे वरोरा पोलिसांनी आरोपी विशाल गुरनुले, तुषार गुरनुले आणि एका अनोळखी साथीदाराविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ११८(१) व ३५२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोंटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रवीण तिरणकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






