राजुरा – राजुरा जुगार अड्डा प्रकरणात पोलिसांनी बामणवाडा येथील नक्षत्र हॉलमध्ये छापा टाकून २० जणांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सांगितल्यानुसार, ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली. घटनास्थळावरून ५८ हजार ३०० रुपये रोख, १२ मोबाईल आणि ताशपत्ते असा एकूण २ लाख ९३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राजुरा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ च्या कलम ४ व ५ नुसार गुन्हा नोंद आहे. सर्व संशयित आरोपी राजुरा तालुक्यातील रहिवासी आहेत. पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वात पथकाने ही कारवाई केली. (चंद्रपुरात १ हजार ३३२ नागरिकांची ८ कोटी ६० लाखांनी फसवणूक, वाचा बातमी)
चंद्रपूर जिल्हयातील राजुरा पोलीस स्टेशनच्या पथकाने मोठी कारवाई करत बामणवाडा येथील नक्षत्र हॉलमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या धडक कारवाईत जुगार खेळत असलेले २० इसम पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून त्यांच्याकडून रोख रक्कम आणि मोबाईलसह तब्बल २ लाख ९३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे राजुरा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
राजुरा जुगार अड्डा: नक्षत्र हॉलमध्ये काय घडले?
प्राप्त माहितीनुसार, राजुरा पोलीस स्टेशनचे पथक दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास गस्तीवर असताना पोलिसांना गुप्त बातमीदार व डायल ११२ द्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे बामणवाडा येथील नक्षत्र हॉलमध्ये जुगार सुरू असल्याचे समजले. या माहितीची खात्री करून नाईट ड्युटीवरील पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ नक्षत्र हॉलमध्ये छापा टाकला. यादरम्यान तेथे टेबलावर बसून ताश पत्त्यांच्या सहाय्याने हार-जितचा जुगार खेळत असलेले २० जण पोलिसांना रंगेहात सापडले.
पोलिसांनी घटनास्थळावरून गोपाल नारायण झवर, दिनेश कृष्णजी आकनूरवार, अशोक छबलदार चैन्नानी, बंडू मारोती जयपुरकर, दीपक मुलीधर मंगरुळकर, सुशील मदनलाल चाडक, सावंत अकलु बोडोवार, मारोती नामदेव चिंचोळकर, शरद मुरलीधर मंगरुळकर, अक्षय गजानन काशेट्टीवार, किशोर दत्तात्रय हिंगाने, राजु वसंतराव साईनवार, राजेश मोहनलाल बजाज, उमेश केशवराव कोडावार, अशोक अंबाराम ठक्कर, निलकंठ दत्तुजी पचारे, विशाल अमृतलाल जैस्वाल, दिलीप श्यामसुंदर वांडरे, जुबेर अन्सार हनफि आणि नरेंद्र भिवाजी काकडे (सर्व रा. राजुरा, ता. राजुरा, जि. चंद्रपूर) या सर्व २० संशयित आरोपींना ताब्यात घेतले.
सदर कारवाईदरम्यान आरोपींची अंगझडती व जुगार टेबलवरील डावावरून एकूण ५८,३०० रुपये रोख रक्कम, २ लाख ३५ हजार रुपये किमतीचे १२ नग मोबाईल फोन आणि ३०० रुपये किमतीचे ताशपत्त्यांचे ६ सेट असा एकूण २ लाख ९३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी राजुरा पोलीस स्टेशन येथे अप क्रमांक ८०७/२०२६ नुसार कलम ४, ५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर यशस्वी कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि राजुराचे सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक राजनारायण ठाकूर, पोलीस अंमलदार आकाश पिपरे व राजीव दुबे यांनी पार पाडली आहे. परिसrात अवैध जुगार अड्ड्यांविरोधात पोलिसांची ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now







1 thought on “नक्षत्र हॉलमध्ये रात्री काय सुरू होतं? पोलिसांचा छापा, २० जणांवर गुन्हा”