Chandrapur city accident चंद्रपूर शहरात रविवारी चंद्रपूर मूल मार्गावर दुचाकींचा भीषण अपघात घडला यामध्ये 18 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.
रविवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास शांतीनगर निवासी 18 वर्षीय सुमित नरेपन हलदार हा मुलगा चंद्रपूर-मूल मार्गावर विरुद्ध दिशेने दुचाकी चालवीत होता, त्यावेळी समोरून येणाऱ्या टँकर ला सुमित ने कट मारली मात्र अचानक समोरून येणाऱ्या दुचाकी वाहनासोबत सुमित ने जोरदार धडक दिली. Chandrapur city accident
यामध्ये सुमितच्या डोक्याला जबर मार लागला नागरिकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी सुमित ला मृत घोषित केले. Chandrapur city accident
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शांती नगर निवासी 18 वर्षीय सुमित हलदार हा विरुद्ध दिशेने आपली दुचाकी क्रमांक MH30 BK7558 ने अतिवेगात येत होता. Chandrapur city accident
सुमित ने टँकर ला कट मारल्यावर अचानक समोरून आलेल्या दुचाकी सोबत सुमितच्या दुचाकी वाहनाची जोरदार धडक झाली.
या धडकेत सुमित रस्त्यावर आपटला, त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
सदर अपघात हा नेहरूनगर फाट्याजवळ घडला, घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस त्याठिकाणी दाखल झाले होते.
पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.