AIMIM’s support to BSP देशात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात होणाऱ्या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत उभे असलेले बहुजन समाजवादी पार्टीचे उमेदवार राजेंद्र उर्फ प्रशांत रामटेके यांना 14 एप्रिल ला दुपारी तीन वाजता च्या पत्रकार परिषदेत बिनशर्त पाठिंबा दिल्याचे एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष सय्यद अमान अहमद यांनी सांगितले.
देशातील काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांनी अल्पसंख्यांक समाजातील मुस्लिम बांधवांसाठी काहीही केलेले नाही. AIMIM’s support to BSP
ही बातमी अवश्य वाचा – माता महाकालीची चैत्र नवरात्रोत्सवाला सुरुवात
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाल्यानंतर सुद्धा देशातील मुस्लिम समाजाच्या समस्या व मूलभूत गरजा पूर्ण करू शकली नाही. त्यामुळे आज एआयएमआयएम ने पत्रकार परिषदेत बहुजन समाजवादी पार्टीला पाठिंबा दिल्याचे पत्रकार परिषदेत घोषित केले.
यावेळी एमआयएम चे जिल्हाध्यक्ष व बहुजन समाजवादी पार्टीचे उमेदवार राजेंद्र उर्फ प्रशांत रामटेके बसपा चे शहर अध्यक्ष शिराजकुमार गोगुलवार व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते. AIMIM’s support to BSP
AIMIM चे जिल्हाध्यक्ष सैय्यद अमान अहमद यांनी सांगितले की हा पाठिंबा राज्य व देशव्यापी नाही आम्ही स्थानिक पातळीवर हा निर्णय घेतला आहे, याबाबत आम्ही राज्य पदाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यावरचं सदर पाठिंब्याचा निर्णय घेतला आहे.