Chaitra Navratri Festival Chandrapur : आजपासून लाखो भाविक करणार माता महाकालीची वारी

Chaitra Navratri Festival Chandrapur चंद्रपूरच्या देवी महाकालीच्या चैत्र नवरात्रोत्सवाचा 14 एप्रिल सकाळी घटस्थापना करीत प्रारंभ झाला. घटस्थापना आणि महाआरतीत हजारो देवीभक्त सहभागी झाले. मराठवाडा आणि तेलंगणा राज्यातील लाखो भाविक महिनाभर चालणाऱ्या यात्रेत सहभागी होतात.

चंद्रपुरातील महत्वाच्या बातम्या : तेली समाज म्हणतो आम्हाला बदनाम करू नका

पहिल्या टप्प्यात होणाऱ्या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या सावटात महाकाली यात्रा सुरू झाली आहे, निवडणूक संपेपर्यंत ही यात्रा सुरू असणार आहे, यात्रा परिसरात असणाऱ्या मतदान केंद्रावर 19 एप्रिलला परिसरात मतदार शिवाय कुणाला प्रवेश नसणार, याबाबत प्रशासनाने नियोजन केले आहे. Chaitra Navratri Festival Chandrapur

 

आंध्र-छत्तीसगड- मध्यप्रदेश-महाराष्ट्राच्या या भागात हजारो वर्षा पूर्वी गोंड राजांची सत्ता होती. या साम्राज्याची राजधानी चंद्रपूर होती. या शासकांची मार्गदर्शक देवी म्हणून माता महाकाली ओळखली जाते.एक छोटे मंदिर असलेले हे क्षेत्र गोंड साम्राज्याची शूरवीर “राणी हिराई” ने आपल्या संपन्न कार्यकाळात आजच्या भव्य रूपात बांधले.आणि सुरु केली देवी महाकालीची यात्रा. पूर्वी पेक्षा दळण -वळण सुलभ झाल्याने ही यात्रा अधिक यात्रेकरूना आकर्षित करीत आहे. Chaitra Navratri Festival Chandrapur

चंद्रपुरातील महत्वाची घडामोड – सुधीर मुनगंटीवार म्हणतात, धृतराष्ट्र सांगेल इतकी विकासकामे

विविध अनुष्ठान व धार्मिक कार्यक्रमांनी हि वार्षिक यात्रा लाखो भाविकांचा केंद्रबिंदू ठरली आहे. देवी महाकालीच्या चैत्र नवरात्रोत्सवाचा आजपासून प्रारंभ झाला. घटस्थापना आणि महाआरतीत हजारो देवीभक्त सहभागी झाले. मराठवाडा आणि तेलंगणा राज्यातील लाखो भाविक महिनाभर चालणाऱ्या यात्रेत सहभागी होतात.

 

चंद्रपूरच्या महाकाली मातेच्या दर्शनासाठी जीव आसुसतो अशी भावना भाविक व्यक्त करतात.
प्रशासन व मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी परिसरात पुरेशी व्यवस्था केली आहे, बुद्ध पौर्णिमा पर्यंत चालणाऱ्या या महाकाली यात्रेत आंध्रप्रदेश व मराठवाडा येथील लाखो भाविक दर्शनाला येतात, अशी माहिती पुजारी सुनील महाकाले यांनी दिली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!