Appropriate use of social media : चंद्रपूर पोलिसांनी समाजमाध्यमाचा केला योग्य वापर आणि मोहीम फत्ते

Appropriate use of social media जग आता आभासी दुनियेत जगत आहे, मात्र या दुनियेचा योग्य वापर केल्यास आपण चांगलं काही घडवू शकतो, असा प्रत्यय चंद्रपुरात प्रत्यक्षात घडला असून पोलिसांनी समाज माध्यमाचा योग्य वापर करीत हरवलेल्या मुलाला अवघ्या 3 तासात शोधून काढले.

ही बातमी अवश्य वाचा : Right To Education अर्ज करण्याची ही शेवटची तारीख

28 एप्रिलला माता नगर चौक भिवापूर येथे राहणारा 12 वर्षीय जैश जितेंद्र डोनेवार हा मुलगा घरून सायकल घेऊन निघाला होता, काही वेळ गेल्यावर जैश हा घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र तो कुठेही आढळून आला नाही.
अंगात पांढरा व निळ्या रंगाची टी शर्ट व ग्रे रंगाचा हाफ पॅन्ट घालून जैश गुलाबी रंगाची सायकल सोबत घेत बाहेर निघाला होता, जैश ला बरोबर बोलता येत नव्हते. Appropriate use of social media

 

 

याबाबत कुटुंबीयांनी महाकाली पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक विजय मुक्के यांची भेट घेत त्यांना संपूर्ण घटनाक्रम सांगितला, घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी पुढचा तपास सुरु केला.
परिसरात जैश चा शोध घेण्यात आला मात्र पोलिसांच्या हाती काही लागले नाही.
आता समोर काय करायचं असा प्रश्न पोलिसांसमोर उपस्थित झाला होता मात्र विजय मुक्के यांनी हिंमत न हारता आपल्या अनुभवाचा वापर समाजमाध्यमांद्वारे करीत जैश बाबत एक संदेश शेअर केला. Appropriate use of social media

 

जैश घराबाहेर निघाला मात्र तो परतला नाही, जैश कुणाला आढळला तर त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणावे असा संदेश अवघ्या काही वेळात चंद्रपुरातील अनेक व्हाट्सएप ग्रुप वर व्हायरल झाला.
अवघ्या 3 तासात पोलीस उपनिरीक्षक विजय मुक्के यांच्या प्रयत्नाला यश आले, एका सुजाण नागरिकांने आपल्या व्हाट्सएप वर तो संदेश बघितला होता, सदर वर्णनाचा मुलगा त्या नागरिकाला चोराला रोड रहमतनगर येथे आढळून आला. Appropriate use of social media

 

त्या मुलासोबत त्या सुजाण नागरिकाने बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला काही बोलता येत नव्हते त्यांनी याबाबत तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला पोलीस डोनेवार कुटुंबाला सोबत घेत पोहचले आणि पुढे जैश त्या नागरिकांसोबत उभा होता.
आई वडिलांनी सुटकेचा निःश्वास घेत त्या नागरिकाचे व विजय मुक्के यांचे आभार मानले.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!