Saturday, May 11, 2024
Homeगुन्हेगारीDemons of Chandrapur : चंद्रपुरातील या राक्षसांना आवरणार तरी कोण?

Demons of Chandrapur : चंद्रपुरातील या राक्षसांना आवरणार तरी कोण?

- Advertisement -
- Advertisement -

Demons Of Chandrapur चंद्रपूर: शहरातील निवासी मूकबधिर शाळेतील वसतिगृहात 23 ऑक्टोबर 2023 ला वसतिगृह प्रमुख अजय वैरागडे यांनी एकांताचा फायदा घेत मूक बधिर मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केला होता, सदर प्रकरण हे 6 महिन्यांनी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात वर्ग शिक्षकांनी तक्रार केली असून या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे.

 

सदर मूकबधिर निवासी शाळा अनुदानित असून मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे, काही वर्षांपूर्वी या शाळेत एका मुलाचा संशयास्पद मृत्यू झाला होता, मात्र त्या चौकशीत काहीच आढळले नाही, आता अनेक वर्षांनी असा गंभीर प्रकार पुढे आल्याने जिल्ह्यातील निवासी शाळेत मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. Demons Of Chandrapur

 

23 ऑक्टोबर ला पीडित मुलगी वसतिगृहात एकटी होती, त्याचा फायदा घेत वसतिगृह प्रमुख अजय वैरागडे यांनी संधी साधत मुलीच्या खासगी भागावर स्पर्श करीत अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला.

 

सदर बाब पीडित मुलीने आपल्या वर्गशिक्षिकेला सांकेतिक देहबोलीने सांगितली, नंतर ही बाब शिक्षिकेने मुख्याध्यापक कालिदास बलकी यांना सांगितली मात्र शाळेची व संस्थेची बदनामी होऊ नये यासाठी सदर प्रकरण दडपण्यात आले. Demons Of Chandrapur

 

संस्थेचे सचिव जयेश वऱ्हाडे व अध्यक्ष अनंत लहामगे यांनी सदर प्रकरण 6 महिने दडपून ठेवले.
उन्हाळ्यात शाळेला सुट्ट्या लागल्याने वसतिगृहातील मुली आपल्या गावी गेल्या त्यावेळी ही बाब मुलीने आपल्या आई-वडिलांना देहबोलीने सांगितली.

 

26 एप्रिलला शाळेतील 4 वर्ग शिक्षकांनी मुलीला सोबत घेत याबाबत शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता पोलिसांनी बाहेरून सांकेतिक भाषेच्या शिक्षकाला बोलावीत मुलीची साक्ष नोंदविली, त्यांनतर पोलिसांनी वसतिगृह प्रमुख अजय वैरागडे, मुख्याध्यापक कालिदास बलकी, संस्था सचिव जयेश वऱ्हाडे व अध्यक्ष अनंत लहामगे यांच्यावर कलम 354, 354 बी, पोक्सो व एट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला.  Demons Of Chandrapur

 

पोलिसांनी चारही आरोपीना अटक केली आहे, सध्या शाळेतील प्रत्येक मुलीची चौकशी सुरू करण्यात आली आहे, यापूर्वी असे प्रसंग घडले काय? याबाबत पोलीस कसून चौकशी करीत आहे.
प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी सुधाकर यादव करीत आहे.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!