Cattle smugglers chandrapur : स्थानिक गुन्हे शाखेची गोवंश तस्करावर कारवाई

Cattle smugglers chandrapur चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांना दिले होते, आदेशाची अंमलबजावणी करताना कोंडावार यांनी विविध पथके नेमत आतापर्यंत अनेक कारवाया केल्या आहे.

 

कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या 137 गोवंश जनावरांची नुकतीच सुटका करण्यात आली होती, सदर प्रकरणी 15 आरोपींवर गुन्हा दाखल करीत 1 कोटीच्या वर मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला होता.

 

पुन्हा 2 दिवसांनी स्थानिक गुन्हे शाखेने मूल पोलीस स्टेशन हद्दीत जनावर तस्करांवर कारवाई केली आहे, 3 मे ला मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहिती मिळाली की मूल शहरातून जनावरांची वाहतूक करण्यात येणार आहे, माहितीच्या आधारे मूल रेल्वे स्टेशन जवळ नाकाबंदी करण्यात आली. Cattle smugglers chandrapur

 

त्यावेळी वाहन क्रमांक CG24 S7667 ला थांबविण्यात आले, वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये निर्दयतेने जनावरांना कोंबण्यात आले होते, त्यापैकी 4 जनावरे मृत अवस्थेत होती.

 

Cattle smugglers chandrapur 2 आरोपी घटनास्थळावरून पसार झाले तर वाहन चालक 39 वर्षीय नईमुद्दीन करीमुद्दीन शेख रा.घुग्गुस याला ताब्यात घेण्यात आले, पळून गेलेले आरोपी असलम शेख, इर्शादउल्ला खान राहणार मूर्तिजापूर अकोला, सदर जनावरे कुरखेडा जिल्हा गडचिरोली येथून वाहतूक करीत आणले असल्याची कबुली वाहनचालक शेख यांनी दिली.

 

गडचांदूर येथील सादिक खान यांच्याकडे जनावरे घेऊन जायचे होते असेही वाहन चालकाने सांगितले, वाहनात 37 गोवंश जनावरे व ट्रक सहित एकूण 16 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 33 गोवंश जनावरे प्यार फाउंडेशन चंद्रपूर मध्ये नेण्यात आले. Cattle smugglers chandrapur

 

 

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस कर्मचारी नितीन साळवे, प्रकाश बलकी, सुभाष गोहोकार, संतोष यलपुलवार, नितीन रायपुरे, दिनेश अराडे यांनी केली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!