Appeal of administration to citizens : त्या मृतकाची ओळख पटेना, मग आता काय?

Appeal of administration to citizens दिनांक 31 मार्च 2024 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर आवारातील गेट जवळ एक अनोळखी इसम झोपलेल्या स्थितीत दिसल्याने त्यास वॉर्डबॉयने उठवून पाहिले असता तो हालचाल करीत नव्हता. त्यामुळे सदर इसमास जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथील अपघात विभागात भर्ती केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

अवश्य वाचा : चंद्रपुरात पार्किंग ची समस्या, प्रशासनाने सुरू केली ही मोहीम

Appeal of administration to citizens याबाबत शहर पोलिस स्टेशन येथे नोंद करण्यात आली असून सदर मृतक हा अनोळखी असून त्याची अजुनपर्यंत ओळख पटलेली नाही व त्याचे कोणीही नातेवाईक समोर आलेले नाही. मृतकाची ओळख पटविण्याकरीता नातेवाईकांचा शोध घेतला असता ते सुध्दा मिळू शकले नाही, त्यामुळे सदर अनोळखी मृतकाची ओळख पटविण्यासाठी संबंधितांनी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

मृतकाचे वर्णन :  अनोळखी इसम वय अंदाजे 65 वर्ष, रंग काळा सावळा, चेहरा-लांबट, डोक्याचे केस बारीक पांढरे, दाढी मिशीचे केस पांढरे, उजव्या हाताला पंजापासून खांदयापंर्यंत दवाखान्याचे बॅंडेज बांधलेला, अंगात तपकिरी काळया लाईन असलेला मळकट फुल शर्ट, सिमेंट रंगाचा फुलपॅन्ट घातलेला अनोळखी पुरुष इसम. Appeal of administration to citizens

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!