Chandrapur City Encroachment चंद्रपूर – चंद्रपूर शहरात 2 मे पासून महानगरपालिका, पोलीस व वाहतूक विभागाच्या संयुक्त कारवाईत अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे मात्र या मोहिमेवरून आता राजकारण तापलंय.
ही अतिक्रमण हटाव मोहीम महानगरपालिकेच्या जिव्हारी लागत असल्याचे चित्र पुढे आले आहे.
अवश्य वाचा : त्या मृतकाची ओळख पटेना
Chandrapur City Encroachment 2 मे ला मुख्य मार्गावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते बिनबा गेट पर्यंत अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली, मात्र त्याठिकाणी काही विशिष्ट समाजाच्या नागरिकांचे अतिक्रमण हटविण्यात आले, असा थेट आरोप राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष दीपक जयस्वाल यांनी लावला आहे.
Chandrapur City Encroachment आयुक्त विपीन पालिवाल हे राजकीय दबावापोटी अतिक्रमण हटविण्याची कारवाई करीत आहे, हे चुकीचे आहे, आमचा कारवाईला विरोध नाही पण त्यांनी सर्वांना समान न्याय द्यायला हवा.
अवश्य वाचा : पशुधनाला इयर टॅगिंग करा
Chandrapur City Encroachment 3 मे रोजी जटपूरा गेट ते रामनगर चौक पर्यंत अतिक्रमण मोहीम मनपाने राबवली मात्र या कारवाई दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे राजेश बेले यांनी तीव्र आक्षेप घेत आयुक्त विपीन पालिवाल हे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सेवक असल्याचा आरोप करीत त्यांनी कारवाई थांबवली नाही तर आयुक्तांची गाढवावर बसून धिंड काढणार असा इशारा राजेश बेले यांनी दिला आहे.
आयुक्त पालिवाल यांनी यावर आम्ही नियमाप्रमाणे अतिक्रमण काढत आहो, शहरातील रस्ते आधीच अरुंद आहे, त्यामुळे नागरिकांना पार्किंग साठी जागा मिळत नाही, म्हणून अतिक्रमण हटाव मोहीम आम्ही राबवित आहे, सदर मोहीम ही पुढील 15 दिवस चालणार असल्याची प्रतिक्रिया विपीन पालिवाल यांनी दिली आहे.