Jua act तळोधी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 2 मे ला पोलीस उपनिरीक्षक किशोर मानकर हे सहकाऱ्यांसाहित पेट्रोलिंग करीत असताना त्यांना बाळापूर रोड येथे स्मशानभूमी समोरील शेत शिवारात झाडाखाली काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती.
बातमी फायद्याची : वार्षिक 520 रुपये भरा आणि मिळवा 10 लाखांचा विमा
Jua Act माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मानकर यांनी पोलीस कर्मचाऱ्यासाहित त्याठिकानी धाड मारली असता 4 जण 52 पत्त्याचा जुगार खेळत होते.
Jua act पोलिसांनी त्याठिकाणी 4 हजार 490 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला, मात्र ज्यावेळी जुगार बहाद्दूर यांची ओळख पटवली असता त्यामध्ये 2 शिक्षक, 1 महसूल विभागातील कर्मचारी आणि कृषी केंद्र चालकांचा समावेश होता. विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत भावी पिढी घडविण्याचे काम शिक्षकांच्या हातात असते मात्र हे शिक्षक आपल्या हातात 52 पत्ते पिसत शिक्षणा सारख्या दानाचे उल्लंघन करताना आढळून आले.
पोलिसांनी 4 आरोपीवर जुगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.