Tiger attack on woman : तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी ती जंगलात गेली पण…..

Tiger attack on woman सिंदेवाही तालुक्यातील कुकुडहेटी येथे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या 33 वर्षीय महिलेवर वाघाने हल्ला करीत ठार केले, मानव वन्यजीव संघर्षाची जिल्ह्यातील ही सहावी घटना आहे.

 

ही बातमी वाचा : चंद्रपुरात डायनासोर?

उन्हाळा सुरू झाल्याने तेंदूपत्ता चा हंगाम चालू आहे, त्याकरिता महिला व पुरुष जंगलात जाऊन तेंदूपत्ता गोळा करीत आहे.

 

Tiger attack on woman 4 मे रोजी सकाळी 8.30 वाजता शिवानी परिक्षेत्रातील कुकुडहेटी उपक्षेत्रातील पेटगाव बिट क्रमांक 322 येथे मौजा बामणिमाल येथील निवासी 33 वर्षीय दीपा दिलीप गेडाम ह्या जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या.

 

त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने दीपा वर हल्ला करीत तिला ठार केले, घटनास्थळ जवळ नाल्याजवळ वाघ बसून होता, त्यावेळी दीपा ह्या तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. आज तेंदूपत्ता गोळा करण्याचा दुसरा दिवस होता.

 

Tiger attack on woman दीपा वर वाघाने हल्ला केल्याची बाब गावी पसरताच नागरिक व वनविभागाने जंगलाच्या दिशेने धाव घेतली, घटनास्थळी दीपा यांचा मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेत होता.
वनविभागाने घटनेचा तात्काळ पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला, मृतक दिपाच्या पतीला तातडीची मदत म्हणून 50 हजार रुपये दिले.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी विदेश कुमार गलगट, ठाणेदार तुषार चव्हाण आदींची उपस्थिती होती.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!