Dinosaur Fossils destroyed जगात सर्वत्र पुरातत्वीय आणि वारसा स्थळे जपली जात असून पर्यटन आणि अभ्यासासाठी ती संरक्षित केली जाते परंतु भारतात मात्र राजकीय, प्रशासकीय आणि जनतेच्या उदासीनतेमुळे राज्यातील अनेक स्थळे नष्ट होत आहेत.
अवश्य वाचा – अतिक्रमण हटाव मोहिमेवरून आयुक्त विपीन पालिवाल यांच्यावर गंभीर आरोप
Dinosaur Fossils destroyed ह्याचेच एक उदाहरण म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील ६५ मिलियन वर्षापूर्वीच्या विशालकाय डायनोसोरचे एकमेव जीवाश्म स्थळ आज नष्ट झाले असून भावी अभ्यासक आणि विज्ञानांसाठी ते आता उपलब्ध राहणार नाही अशी माहिती आणि खंत येथील भूशास्त्र संशोधक प्रा सुरेश चोपणे ह्यांनी व्यक्त केली आहे.
Dinosaur Fossils destroyed आज जिल्ह्यात केवळ तेम्भूर्डा-पिसदुरा ह्या एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डायनोसोर चे जीवाश्म आढळतात. ह्याच परिसरात भद्रावती तालुक्यात देखील अल्प अवशेष मिळाली आहेत ,परंतु पिसदुरा येथे त्यांची हाडे, विष्ठा, शाख-शिंपले आणि वनस्पती जीवाश्मे मोठ्या प्रमाणावर आढळत होती .
प्रा.सुरेश चोपणे ह्यांनी १९९९ पासून आजपर्यंत ह्या परिसरात संशोधन करून काही महत्वाचे पुरावे गोळा केले होते. २७ एप्रिल २०२४ रोजी चोपंने ह्यांनी ह्या परिसराला सर्वेक्षणाच्या दृष्टीने भेट दिली असता येथील सर्व जीवाश्मे जवळ जवळ नष्ट झाली असल्याचे निदर्शनास आले.
आतापर्यंत त्यांनी गोळा केलेले हे अमूल्य पुरावे संशोधक आणि विध्यार्थ्या साठी त्यांनी व्यक्तिगत अश्म संग्रहालयाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहेत . तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी मा भोगे साहेब ह्यांना एक प्रस्ताव सादर करून पिसदुरा येथे डायनॉसोर पार्क आणि भद्रावती येथे मोठे पुरातत्व संग्राहलय उभारण्याचा प्रस्ताव दिला होता आणि तो मंजूर झाला होता. परंतु तत्कालीन सरकारने मंजुरीला वेळ लावल्याने डायनोसोर स्थळ, जिल्ह्यातील पुरातत्वीय आणि ऐतिहासिक वारसा स्थळांचे संरक्षण होऊ शकले नाही.
चंद्रपूर जिल्हा ऐतिहासिक दृष्ट्या समृद्ध असूनही आज सुद्धा पुरातत्व विभागाचे संग्रहालय होऊ नये ही खेदाची बाब आहे .त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ऐतिहासिक मुर्त्या चोरी जात असून ही स्थळे अतिक्रमित होत आहेत.
जिवती येथील जीवाश्मस्थळ असेच काही संशोधक आणि भूशास्त्र विध्यार्थ्यांनी अभ्यासाठी जीवाश्मे गोळा करून संपवून टाकले.
पिसदुरा हे स्थळ संरक्षित न केल्याने डायनोसोर चे जीवाश्मे विविध कारणाने आज गायब झाली आहेत, त्यात शेतीची कामे, शेतीसाठी अतिक्रमण, बाहेरून येणाऱ्या संशोधक आणि लोकांनी जीवाश्मे घेवून जाणे आणि विकणे अश्या गतीविधीचा समावेश आहे .प्रा सुरेश चोपणे ह्यांनी जिल्ह्यातील महत्वाच्या पुरातत्वीय पुराव्यांना गोळा करून घरी एक शैक्षणिक संग्रहालय उभारले असून विसापूर येथे नुकतेच सुरु झालेल्या बोटनिकल गार्डन येथे संग्रहालयात ,डायनोसोरची जीवाश्मे,विविध प्रकारची अश्म आणि पाषाण युगील अवजारे भेट दिली आहेत, तसेच शहरात पुरातत्वीय संग्रहालय झाल्यास इतर सर्व पुरावे सुद्धा दिली जातील असे त्यांनी सांगितले.
संशोधक,नागरिक आणि शासनाने अश्या सर्व स्थळांचे जतन करावे आणि मोलाचा हा ठेवा भावी पिढीला पाहण्यासाठी आणि अभ्यासाठी संरक्षित करण्यात यावा असे आवाहन सुरेश चोपणे ह्यांनी केले आहे..
Dinosaur Fossils destroyed ६५ दशलक्ष वर्षापूर्वी एका विशाल उल्केच्या पृथ्वीवर आदळल्याने आणि त्याच दरम्यान पृथ्वीवर अनेक ठिकाणी ज्वालामुखी उद्रेक होऊ लागले. हाच लावारस उत्तर-पश्चिमेकडून चंद्रपूर कडे वाहात आला. आणि त्याखाली त्यावेळेस विकसित झालेले प्रचंड आकाराचे डायनोसोर प्रजातीचे अनेक प्राणी इथे आणि महाराष्ट्रात मृत्युमुखी पडले . एका मागोमाग एक बेसाल्ट खडकांचे थर साचल्याने पश्चिम महाराष्ट्रात ते खूप खाली गाडल्या गेले तर चंद्रपूर कडे बेसाल्ट खडकाचा थर जाड नसल्याने तो लाखो वर्षात क्षरण झाला आणि ६ कोटी वर्षापूर्वीचे डायनोसोर जीवाश्म रूपाने बाहेर येवू लागले.
डायनोसोरची जीवाश्मे वर्धा,गडचिरोली आणि उमरेड परिसरात सुधा मिळाली आहेत परंतु तीथेसुधा आता अवशेष शिल्लक राहिली नाही ही गंभीर बाब आहे अशी चिंता सुरेश चोपणे यानी व्यक्त केली आहे.