Cattle mafia chandrapur चंद्रपुर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते.
अवश्य वाचा : महाराष्ट्र दिनी चंद्रपुरात पाळला काळा दिवस
आदेशाचे अंमलबजावणी करताना स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी विविध पथक तयार करीत जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यासंबंधीने निर्देश दिले. Cattle mafia chandrapur
1 मे महाराष्ट्र दिनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की मोठ्या प्रमाणात गोवंश कत्तलीकरिता तेलंगणा राज्यात जाण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून वाहतुक होणार आहे.
बातमी आपल्या कामाची : चंद्रपूर पोलिसांनी केला समाजमाध्यमाचा योग्य वापर आणि हरवलेला मुलगा अवघ्या 3 तासात सापडला
माहितीच्या आधारे पोलिसांनी मौजा हिरापूर येथील शेत शिवारात धाड मारली, त्याठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात तब्बल 7 वाहनात एकूण 150 गोवंश अवैधरित्या क्रूरतेने हात-पाय बांधून त्यांना कोंबले होते. Cattle mafia chandrapur
7 वाहनातील 150 गोवंश ला बाहेर काढत त्यांची सुटका करीत नगरपालिका राजुरा येथील कोंडवाड्यात जमा करण्यात आले.
पोलिसांनी या प्रकरणी अब्दुल अजीज अब्दुल सहित तब्बल 15 आरोपींवर गुन्हे दाखल केले आहे, स्थानिक गुन्हे शाखेने या कारवाईत एकूण 1 कोटी 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीना पुढील तपासकामी गडचांदूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. Cattle mafia chandrapur
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस कर्मचारी धनराज, स्वामीदास, अजय, प्रकाश, नितीन, सुभाष, किशोर, रजनीकांत, दिनेश, संतोष व प्रशांत यांनी केली आहे.