Chandrapur mahanagar Palika : चंद्रपूर मनपाची मान्सूनपूर्व तयारी

Chandrapur mahanagar Palika चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने मान्सूनपूर्व नाले स्वच्छता मोहिमेची सुरवात करण्यात आली असुन गाळ किंवा कचऱ्यामुळे मोठ्या नाल्यातील पाणी अडणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे.

अवश्य वाचा : चंद्रपुरात अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात

Chandrapur mahanagar Palika   भारतीय हवामान खात्याने यावर्षी सरासरीहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच हवामान बदलांमुळे ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडत असल्याचे लक्षात घेऊन महापालिका आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनानुसार पावसाळापूर्व गटार सफाई कामे लवकरच एप्रिल महिन्यापासुन सुरु करण्यात आलेली आहेत.

सविस्तर वाचा : 15 आरोपी, 1 कोटींचा मुद्देमाल, स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Chandrapur mahanagar Palika अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील व उपायुक्त मंगेश खवले यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सफाई मोहिम सुरु असुन १२० सफाई कर्मचारी, ३ जेसीबी, २ पोकलेन, गाळ वाहतुकीसाठी ६ ट्रॅक्टरद्वारे नैसर्गिक मोठ्या नाल्यांच्या साफसफाईची कामे तसेच बंदिस्त गटारे साफसफाईची कामे करण्यात येत आहेत.

 

नाले स्वच्छता अभियानाअंतर्गत नाल्यांची रूंदी व खोली पूर्णपणे स्वच्छ करून पावसाळी पाणी वाहण्याकरिता सुरळीत प्रवाह करण्यात येत असुन याद्वारे वाहणाऱ्या पाण्याची क्षमता वाढेल आणि नाल्यांच्या काठावर असलेल्या वस्त्यांत पावसाळ्यात येणाऱ्या पूरापासून सुरक्षा प्रदान होईल.

 

 

शहरातील मोठ्या नाल्यांची तसेच लहान नाल्यांची साफ सफाई सुरू असून, मनुष्यबळ व जेसीबीच्या मदतीने गाळ आणि कचरा बाहेर काढण्यात येत आहे. तसेच नाल्याभोवती वाढलेली झाडेझुडपी व नाल्यातील दगड बाहेर काढून सांडपाण्याला वाट काढून दिली जात आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!