Cannibal tiger in cage 4 नागरिकांचा जीव घेणारा नरभक्षक वाघ अखेर वनविभागाच्या जाळ्यात सापडला असून 29 एप्रिलला वनविभागाच्या चमूने कारवा रोड जवळ वनविभागाच्या शूटरने वाघाला डार्ट करीत पकडले.
7 जानेवारी ला कारवा जंगलात शामराव तिडसुरवार, 27 फेब्रुवारी ला गुराखी लालबच्ची चौहान, 14 मार्च ला नामदेव आत्राम व 14 एप्रिलला मनोहर उमाटे यांची वाघाने शिकार केली होती. Cannibal tiger in cage
वाघ नरभक्षक झाल्याने वनविभागावर त्याला पकडण्यासाठी एकप्रकारचा दबाव निर्माण झाला होता, वनविभागाने वाघाची शोधमोहीम सुरू केली, बल्लारपूर वन परिक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना वनविभागाला सदर वाघ हा कारवा रोड जवळ असल्याची माहिती मिळाली. Cannibal tiger in cage
29 एप्रिलला सायंकाळी कुंदन पोडचलवार यांच्या मार्गदर्शनाखाली शूटर अविनाश फुलझेले व वनरभक्षक यांनी नरभक्षक वाघाला डार्ट करीत पकडले.
वाघाची तपासणी केल्यावर त्याला जेरबंद करीत त्याला पुढील उपचारासाठी वन्यजीव उपचार केंद्रात नेण्यात आले. Cannibal tiger in cage
वाघ जेरबंद झाल्याची माहिती मिळताच बल्लारपूर व कारवा येथील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
वाघाला पकडण्याच्या मोहिमेत उपवन संरक्षक श्वेता बोड्डू यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वन संरक्षक आदेश शेंडगे, वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे, ए. एस. पठाण आदींचा समावेश होता.